पुणे: धूळ, ध्वनिप्रदूषण आणि रात्रभर सुरू राहणाऱ्या आरएमसी प्लांटच्या त्रासाने वडगाव खुर्दमधील नागरिक हैराण झाले आहेत. अनधिकृत प्लांटवर कारवाईचे नियोजन करून, पोल. अनधिकृत प्लांटवर कारवाईचे नियोजन करून, पोलिस बंदोबस्ताची तयारी असतानाही ऐनवेळी मोहीम रद्द होत असल्याने महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. राजकीय दबावामुळे कारवाई थांबवली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.