पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायाल. पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे भासवत कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि ७० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. शिवणे, पुणे) असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे, पीडित पत्नीने न्यायालयात पतीविरोधातील आरोप नाकारले.