Farmer Scheme: कमी पर्जन्यमान आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विशेष मोही. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उपअभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) योजनेतून सन २०२६-२७ साठी अकोला जिल्ह्याला १,६९० बियाणे मिनीकिट्सचे (६७.६० क्विंटल बियाणे) उद्दिष्ट मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुषार जाधव यांनी केले आहे..