Vasai News: वसईत विहिरीत पोहताना 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थी बुडाला असून प्रिलिम परीक्षेनंतर दुर्दैवी घटना घडली आहे. वसई : वसई पश्चिमेकडील माणिकपूर परिसरात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. प्रेम प्रवीण सावंत असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रेम हा वसई पूर्वेकडील गोखीवरे, दीपदर्शन परिसरात कुटुंबासह (Vasai News) राहत होता. वर्तक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता.