Govinda On Extra Marital Affair: गोविंदानं विवाहबाह्य संबंधांचे आरोप, सुनीता आहुजा यांचा वेगळं राहण्याचा निर्णय आणि घटस्फोटाच्या चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. गोविंदानं 'एबीपी न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितलं की, सुनीता जे काही करतेय, ते त्यांच्या मुलांच्या भल्यासाठीच करतेय. अभिनेत्यानं सुनीताला आपलं 'पहिलं प्रेम' असं संबोधलं आणि म्हटलं की, प्रेमासारख्या गोष्टीशी खेळणं योग्य नाही.