NCP PC On Finance Ministry : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आमच्याकडून पूर्णतः बंद आहेत, आम्ही कधीही भेटण्यासाठी वेळ मागितलेली नाही असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “सुनेत्रा ताई पवार या आमच्या पक्षाच्या नेत्या,उपमुख्यमंत्री आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर गेलो होतो. परंतु, काही ठिकाणी ज्या अशा बातम्या येतात की ५ मंत्री जाणार आहेत, मर्जर होणार आहे, यात काहीही तथ्य नाही.