राहुल यांनी सांगितले की, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, महिला, तरुण आणि व्यावसायिकांनी 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या विरोधी पक्षांच्या सभेला उपस्थित राहावे. Rahul Gandhi: आमची मते चोरली जात आहेत आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देताना चलो दिल्लीचा नारा दिला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्ट करताना रामलीला मैदानातील रॅलीला उपस्थित राहण्याचं आवाहन झालं आहे.