Pune Crime News: वैद्यकीय पुरावे आणि इतर साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांच्या न्यायालयाने पतीला दोषी ठरविले. पुणे : पुण्यात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला कॅल्शिअमच्या गोळ्या असल्याचे सांगून कॅप्सूलमधून ब्लेडचे तुकडे खाऊ घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला न्यायालयाने 7 वर्षे सक्तमजुरी आणि 70 हजार रुपये (Pune Crime News) दंडाची शिक्षा सुनावली आहे. पत्नीने न्यायालयात पतीविरोधातील आरोप (Pune Crime News) नाकारले.