बारामती, ता. २५ : आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव, नात्यांमधील ओलावा आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या वसंत हंकारे यांच्या ‘बाप समजावून घेताना’ या व्याख्यानाने शनिवारी (ता. २४) बारामतीकरांना भावूक केले. विद्यानगरीतील ग. दि. मा. सभागृहात झालेल्या या व्याख्यानादरम्यान अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. पालक आणि तरुणाईला अंतर्मुख करणारा हा कार्यक्रम एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘प्रतिबिंब’ व्याख्यानमालेअंतर्गत आयोजित करण्यात आला होता.