सध्या मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर ही चांगलीच चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याने काहींनी तिच्यावर निशाणा साधला. पण आता प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्यांवर नेटकरी भडकले आहेत. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता हनमघर. तिने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडले. पण नंतर प्राजक्तााला अभिनेता, लेखक पंकज पंचारियानी पाठिंबा दिला. प्राजक्ताने पंकजने लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे.