काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू शापूर जादरान याचं दुर्मिळ आजाराने निधन झालं होतं. या घटनेने क्रिडाविश्वात खळबळ उडाली असताना आता आणखी एक निधनाची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या उदयोन्मुख तरुण क्रिकेटपटू मेहदी हसन हृदोय यांचे वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी निधन झाले. हृदोय हे लेफ्टी बॉलर होते आणि ते चटगांव डिव्हिजनच्या अंडर-१८ संघाकडून खेळले होते. हृदोय ल्युकेमियाच्या आजाराने ग्रस्त होते आणि त्यांचे उपचार सुरू होते.