Nanded farmer suicide private finance: दहा हजारांच्या कर्जापोटी ७० हजारांची वसुली, फायनान्स कंपनीचा संचालक व कर्मचारी फरार, कुटुंबीयांचा खुनाचा आरोप . लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आधीच अल्पभूधारक शेतकरी, त्यात खरीप हंगाम बुडाला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका शेतकऱ्याने खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी नांदेड शहरात उघडकीस आली. मृताच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून खासगी सावकाराने केलेला खून असल्याचा आरोप करीत पोलिस ठाण्यात ठिय्या दिला.