दहशतवादविरोधी पथकाला २१ ऑक्टोबर रोजी अख्तर हा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याची भाषणे समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आणि हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या चिथावणीखोर पोस्ट प्रसारित केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने माहीम येथील मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (३३) या रॅपिडो चालकाला अटक केली.