मालवण : तारकर्ली किनाऱ्यावर उभ्या असलेल्या रापण मासेमारीच्या दोन नौकांना शुक्रवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक नौका पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे तारकर्ली परिसरात एकच खळबळ उडाली असून रापण मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे..तारकर्ली येथील नरेश कांदळगावकर आणि गुंडू कांदळगावकर यांच्या मालकीच्या या रापण नौका किनाऱ्यावर उभ्या होत्या. त्यापैकी एका नौकेला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने ही नौका जळून खाक झाली.