सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात डिजिटल तिकीट व्यवस्थेसाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी कार्डव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे. कार्ड असूनही सवलतीचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारींमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटीच्या या व्यवस्थेतील त्रुटींमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, डिजिटल सुविधेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..महिलांसाठी शासनाने जाहीर केलेली तिकीट सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक केले आहे.