रत्नागिरी : पावसाळा संपताच रत्नागिरी शहरावर पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. शहरात दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय लागू असतानाच आठवड्यातून आणखी एक. शहरात दर सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय लागू असतानाच आठवड्यातून आणखी एक दिवस पाणी बंद ठेवण्याची शक्यता व्यक्त झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पाणी जपून वापरण्याची गरज मान्य असली, तरी वारंवार पाणीपुरवठा बंद ठेवण्याऐवजी पर्यायी जलस्रोत तातडीने कार्यान्वित करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. .