कोल्हापूर : तिरूपतीहून कोल्हापूरला आलेल्या हरिप्रिया एक्स्प्रेसमध्ये एक संशयास्पद बॅग आढळली. यामुळे प्रवाशांत घबराट उडाली. गाडीतून उतरत असताना चेंगराचेंगरी झाली. कोल्हापूर : तिरूपतीहून कोल्हापूरला आलेल्या हरिप्रिया एक्स्प्रेसमध्ये एक संशयास्पद बॅग आढळली. या प्रवाशांना पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापूर रेल्वेस्थानकावर हा प्रकार घडला. बंदूकधारी पोलिसांचा फौजफाटा आणि स्थानकावरील धावपळ त्यामुळे प्रवासीही गांगरून गेले. मात्र अर्धा तासानंतर हे मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट झाले आणि साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला..