आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांनी आपल्या घरी दिवाळीची शानदार पार्टी दिली. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी, कलाकार आले आणि त्यांनी उपस्थितीने चार चाँद लावले. दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सणाचा उत्साह वाढताना दिसत असून बॉलिवूडमध्येही दिवाळी पार्टींना सुरूवात झाली आहे. यातली पहिली पार्टी होती ती अभिनेता आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांच्या घरी.. आयुष्मान खुरानाने त्याच्या घरी शानदार पार्टी दिली, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली.