IND vs NZ Security Guards on Ground: नितीशने विजयी फटका मारला. त्यानंतर जल्लोष सुरू होण्याआधीच सुरक्षा रक्षकांनी मैदान गाठल्याचे पाहायला मिळाले. ईस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळल्या गेलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. भारतीय संघाने न्यूझीलंडच्या हातून विजय हिसकावून घेतला. सामन्यादरम्यान दोनदा भारताच्या विजयाची शक्यता केवळ चार टक्के होती. म्हणजेच, दोन वेळा विजयाचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रणालीने न्यूझीलंडच्या विजयाची शक्यता ९६ टक्के दर्शवली होती.