Bank Fraud: कॅनरा बँकेची ₹२१२.३४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी IL&FS एनर्जी डेव्हलपमेंट कंपनीविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने एका मोठ्या बँक घोटाळा प्रकरणात मुंबईस्थित आयएल अँड एफएस एनर्जी डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड आणि तिच्या अनेक माजी व्यवस्थापकीय संचालक व संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कॅनरा बँकेच्या मुंबई सर्कल कार्यालयाने केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे, ज्यात बँकेला २१२.३४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.