India Water Crisis: कधीकाळी २६० हून अधिक तलाव, आता मोजकेच पाण्याने भरलेले असतात. देशातील मोठ्या शहरांमध्ये पाण्याचं गणित बिघडलं आहे. अलीकडच्या उन्हाळ्याच्या दिवसांत, बेंगळुरूच्या रहिवाशांना एका पाण्याचे टँकर मिळवण्यासाठी खाजगी पुरवठादारांना हजारो रुपये मोजावे लागले आहेत. एकेकाळी या शहरात २६० हून अधिक तलाव होते, पण आज त्यापैकी निम्म्याहून कमी सुमारे ८० ते ८१ तलावांतच पाणी शिल्लक आहे. संपूर्ण शहरात हजारो बोअरवेल पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत.