India Alliance on Gyanesh Kumar: मतचोरी आणि SIR मधील कथित गोंधळावरून इंडिया आघाडी मोठा प्लॅन आखत आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात जनतेच्या दरबारात महाभियोग भरवणार आहे. मतचोरी आणि SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडी आक्रमक भूमिका कायम ठेवणार आहे. यासाठी इंडिया आघाडीकडून मोठ्या रणनीतीची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जनतेच्या दरबारात महाभियोगासारखी मोहीम उभारण्याची योजना आखली जात असल्याचे सांगितले जात आहे.