Ahilyanagar Accident: अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. स्कॉर्पिओची तीन दुचाकींना जोरदार धडक बसली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. जामखेड-नगर रोडवर निंबोडी गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. हॉटेल उत्सवसमोर एका स्कॉर्पिओ गाडीने तीन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयूर शिर्के असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.