Sushma Andhare : एखादी स्त्री कुठल्याही हल्ल्याने नामोहरम होत नाही तेव्हा तिच्या चारित्र्यावर हल्ला करणे हा रामबाण इलाज इथल्या पुरुषी मानसिकतेचा असतो, असंही पुढे सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. Sushma Andhare on Manoj Jarange Patil Audio Clip : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लीप ऐकवली होती, त्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.