पाच वर्षापर्यंत मुलांचा मानसिक विकास तीव्रतेने होते. त्याकाळात मातृ भाषेत मुलांसोबत होणारी बातचीत त्यांच्या मानसिक विकासात महत्वाची भूमिका बजावते. अस विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. Devendra Fadnavis नागपूर : जेन झी (Gen-Z) आणि जेन अल्फा (Gen-Alpha) हे माहितीच्या स्फोटाच्या काळात, तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मले आहे. मात्र, त्या माहितीवर आधारित ज्ञान (नॉलेज) त्यांच्याकडे नाही. त्यामुळे या काळातील विद्यार्थी, तरुणांकडे असलेल्या माहितीला ज्ञानात रुपांतरित करण्याची जबाबदारी शिक्षक, मुख्यधापकांवर आहे.