आम्ही कायम मनोज जरांगे यांच्या मागे आहोत, त्यांची कुठेही बदनामी होणार नाही याची आम्हाला काळजी आहे. ज्यांनी कोणी खोटंनाट केले त्यांना सर्व मिळून खोटं पाडू. अहिल्यानगर : भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांनी आज शिर्डीतील साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी केलेल्या 500 कोटींच्या आरोपांसह विविध प्रश्नांना उत्तरे दिले.