Anant Singh Expelled From JDU : पक्षविरोधी कारवाया आणि पक्षश्रेष्ठींविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी जनता दल युनायटेडने (JDU) मोकामाचे बाहुबली आमदार अनंत सिंह आणि त्यांच्या पत्नी नीलम देवी यांची 06 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुंबई : बिहारच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल (JDU) पक्षाने मोकामाचे बाहुबली आमदार अनंत कुमार सिंह यांच्यावर मोठी कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.