सेकंड मेन येवल्यात सोयाबीन सात हजारांवर; कांद्याला ४,२५१ रुपयांपर्यंत भाव! मुख्य बाजार आवारात कांद्याची दोन हजार क्विंटल आवक; बाजारभाव स्थिर सकाळ वृत्तसेवा येवला,ता.२४ : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या सर्वसाधारण भावाने सात हजार रुपयांचा टप्पा गाठला असून।कमाल ७,१०१ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दुसरीकडे,गावरान कांद्याला कमाल ४,२५१ रुपये, तर सर्वसाधारण ३,७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मुख्य बाजार आवारात कांद्याची अंदाजे दोन हजार क्विंटल आवक झाली.