Maharashtra Travel Destination: नोव्हेंबर महिना हा महाराष्ट्रात फिरण्यासाठी उत्तम मानला जातो. पावसाळ्यानंतर निसर्ग खुललेला असतो आणि हवामानही छान असतं. त्यामुळे या महिन्यात फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर महाराष्ट्रातील ही सुंदर ठिकाणं नक्की एक्सप्लोर करा. पावसाळा संपल्यानंतर महाराष्ट्रातील निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलतं. हिरव्यागार डोंगररांगा, धबधब्यांनी सजलेला परिसर, शांत समुद्रकिनारे आणि आल्हाददायक हवामान यामुळे नोव्हेंबरमध्ये फिरण्याची मजा काही औरच असते.