न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने युवा खेळाडूंचं कौतुक करत संघाच्या ताकदीबाबत मोठं विधान केलं. नेमकं काय म्हणाला अय्यर? न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने अडचणीतून बाहेर पडत शानदार विजय मिळवला. 112 धावांत 6 विकेट्स गमावल्यानंतरही भारताने सामन्यात पुनरागमन केले. या विजयानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी आणि नमन धीर यांच्यासह न्यूझीलंडच्या फिरकीपटूंचेही कौतुक केले.