Vijay Deverakonda Rashmika Mandanna: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांचा घटस्फोट होणार असल्याची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. 26 फेब्रुवारी रोजी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचे लग्न झाले. लग्नानंतर विजय आणि रश्मिका हे कायम एकत्र दिसत आहेत. नुकताच दोघांनी कॉफी विथ करण या लोकप्रिय शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान, विजय देवरकोंडाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.