भारतात पाकिस्तानमधील हानिया आमीर ही अभिनेत्री बहुसंख्य लोकांना माहिती आहे. परंतु या मालिकेतील अभिनेत्री नेमकी कोण आहे, याची अनेकांना कल्पना नाही. पाकिस्तानचे कलाकार हे भारतीय अभिनेता, अभिनेत्रींचे चाहते आहेत. एवढंच नव्हे तर पाकिस्तानी कलाकार हे भारतीय संगिताच्या खूपच प्रेमात असल्याचे वेळोवेळी समोर आलेले आहे. पाकिस्तानमधील मालिका या नेहमीच चर्चेचा विषय असतात. भारतातही या मालिका आवडीने पाहिल्या जातात. सध्या अशीच एक मालिका चर्चेचा विषय ठरली आहे.