30 वर्षांपूर्वीचं रेखा आणि अक्षय कुमार बोल्ड गाणं, ज्याला कुटुंबासोबत पाहण्यासाठी घाबरायचे लोक. पण आता 30 वर्षानंतर Gen Z मध्येही या गाण्याची प्रचंड क्रेझ. हिंदी चित्रपटसृष्टीत काही गाणी अशी असतात, जी प्रदर्शित झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा चर्चेत येतात. 90 च्या दशकातील असंच एक गाणं सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. अभिनेत्री रेखा यांचा ग्लॅमरस अंदाज, त्यांचे डान्स मूव्ह्स आणि गाण्याची हटके शैली यामुळे त्या काळात या गाण्याची बरीच चर्चा झाली होती.