मासिक पाळीदरम्यान थकवा, पोट फुगणे आणि वेदना यांचा त्रास अनेक महिलांना होतो. अशा वेळी ब्लॅक कॉफीमध्ये तूप मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. पण या मिश्रणाचे खरंच फायदे होतात का? जाणून घ्या... मासिक पाळीदरम्यान ब्लॅक कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचा ट्रेंड चर्चेत आहे. मात्र, यामुळे पाळीच्या वेदना कमी होतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुपामध्ये फॅट्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात.