Nashik Youth Kidnapping: कल्याण -ऑनलाइन गेमिंगच्या क्रिप्टो व्यवहारातून नाशिकच्या तरुणाचे अपहरण केले होते. यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी हरियाणामध्ये मोठी कारवाई केली आहे. ऑनलाइन गेमिंगच्या क्रिप्टो व्यवहारातून नाशिकच्या तरुणाचे अपहरण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकमधील एका २२ वर्षीय तरुणाला ऑनलाइन गेमिंगशी संबंधित क्रिप्टोकरन्सी व्यवहारासाठी जयपूरला बोलावून त्याचे अपहरण करण्यात आले होते. खंडणीसाठी त्याला ओलीस ठेवण्यात आले होते.