जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याने विभागीय आंतरशालेय रायफल शूटिंग. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, भुसावळ येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी आदित्य राजेंद्र सोनवणे याने विभागीय आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेत आदित्यने ४०० पैकी तब्बल ३९५.७ गुण मिळवत नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.