मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात विविध मागण्यांसाठी आठ महिन्यांहून अधिक काळ आंदोलन करणारे बौद्ध भन्ते राजेश बलखंडे ऊर्फ भदंत विमंस यांचा २०२६-२७ या वर. .मुंबई विद्यापीठात आंबेडकर अभ्यास या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी बनते बलखंडे यांनी प्रवेश घेतला होता. हा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी त्यांना निर्णयाची माहिती देण्यात आली.