मुंबई : राज्य सरकारच्या सूचनेनुसार आणि संभाव्य टंचाईचे नियोजन म्हणून एकीकडे मुंबई महापालिकेकडून संपूर्ण मुंबईत १० % पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे, तर दुसरीकडे. अत्यंत कमी दाबाने येणारे पाणी आणि अपुरा पुरवठा यामुळे सी आणि डी विभागातील नागरिकांना पाण्याची किमान गरजा भागवणेही कठीण झाले आहे..मुंबई शहर आणि उपनगरातील रहिवाशी पाणीटंचाईने त्रस्त झाले असतानाच दिवाळीनंतर पाणीकपातीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.