The crop is lost; it is now time to harvest it for animal fodder घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: पावसाने ऐन पीक भरण्याच्या काळात पाठ फिरवल्याने घनसावंगी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेच भरले नसल्याने उत्पादनाची आशा जवळपास मावळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली असली तरी त्यामागे सोयाबीनची अपेक्षा नसून, जनावरांसाठी भुसा तरी मिळावा, एवढीच आशा उरली आहे.