Donald Trump: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांवर 250 टक्के शुल्क लावण्याची धमकी दिली होती. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांना स्पष्टपणे सांगितले होते की, जर त्यांनी लढाई थांबवली नाही, तर अमेरिका त्यांच्यासोबतचा व्यापार थांबवेल. त्यांच्या मते, या इशाऱ्यानंतर भारत आणि पाकिस्तानने गोळीबार थांबवला.