Pune Crime News: इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ डिलीट करायला भाग पाडलं म्हणून आयटी अभियंत्याच्या नववीत शिकणाऱ्या मुलाने अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला केला आहे. पुणे: पुण्याला हादरवणारा रक्तरंजित थरार एका उच्चभ्रू शाळेत घडला आहे. म्हाळुंगे-बालेवाडीतील एका प्रतिष्ठीत शाळेच्या सातव्या मजल्यावर ही धक्कादायक घटना शुक्रवारच्या दुपारी घडली. मात्र याची ठिणगी महाबळेश्वर-पाचगणी (Pune Crime News) परिसरात पडली. 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान शाळेची सहल महाबळेश्वर-पाचगणीला गेली होती.