विशेष म्हणजे केरळमधील 99.1 टक्के लोक मांसाहारी आहेत. देशात नागालँडमध्ये सर्वाधिक मांसाहारी लोक आहेत. काँग्रेसने याला अधिकारांमधील हस्तक्षेप म्हटले आहे. Om Prakash Mathur: पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच, केरळचे नवनियुक्त राज्यपाल, ओम प्रकाश माथूर यांनी लोक भवनात मांसाहारी भोजन तयार करण्यावर आणि ते वाढण्यावर बंदी घातली आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्ष सीपीआय(एम)ने या निर्णयावर टीका केली. आता राज्यपालच ठरवतील का की काय खावे, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला.