Chhatrapati Sambhajinagar Crime News: बजरंग चौक ते बळीराम पाटील चौकादरम्यान मुख्य रस्त्यावर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शेकडोंच्या जमावासमोर हा रक्तरंजित थरार घडला. छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अतिशय खळबळजनक आणि थरारक घटना समोर आली आहे. व्यावसायिक वर्चस्ववाद आणि जुन्या अपमानाचा बदला घेण्यासाठी एका मित्रानेच आपल्या बालमित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या (Chhatrapati Sambhajinagar Crime News) केल्याची संतापजनक घटना घडली आहे.