मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ क्लिप समोर आणल्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी 500 कोटींच्या देवाण-घेवाणाची ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महायुतीमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच, शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेत्यांवर आरोप केले आहेत.