जगभरात नव्या विषाणूच्या संसर्गाची चर्चा सुरू झाली आहे. शमोंडा व्हायरसचा पहिला मानवी संसर्ग नोंदवण्यात आल्याने या विषाणूबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हा व्हायरस नेमका काय आहे, तो किती धोकादायक आहे आणि WHO ने याबाबत काय माहिती दिली आहे, जाणून घेऊयात. फ्रान्समध्ये शामोंडा व्हायरसच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिली आहे. आतापर्यंत प्रामुख्याने जनावरांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूचा माणसामध्ये संसर्ग झाल्याने आरोग्य यंत्रणांचे लक्ष वेधले गेले आहे.