बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सोशल मीडियातून ब्रेक घेतला आहे. दसऱ्याला केलेल्या पोस्टनंतर त्यांनी दुसऱ्या दिवशीही आरोग्याची अपडेट दिली, ज्यात. दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. डॉक्टरांनी आपल्याला सक्तीचा आराम करायला सांगितलं असून रिकव्हर व्हायला सांगितलं आहे. त्यामुळे मी काही दिवस सोशल मीडियावर सक्रिय राहणार नाही, असं अमिताभ यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टमुळे त्यांचे चाहते त्रस्त झाले होते.