कोजागिरीच्या दिवशी उद्याने सकाळी सहा ते अकरा आणि सायंकाळी चार ते रात्री बारा या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीतील उद्याने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रविवारी (दि. २५) रात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना कुटुंबीयांसह चांदण्यांच्या प्रकाशात कोजागिरीचा आनंद घेता यावा, यासाठी उद्यान विभागाने उद्यानांच्या वेळेत विशेष वाढ केली आहे.