कराड : गोळेश्वर (ता. कराड) येथे कौटुंबिक वादातून डोक्यात स्टूल घातल्याने धनाजी सत्यवान अदलिंगे याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर पुरा. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सोनसळ घाटात फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. .या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी मृताची आई सुरेखा सत्यवान अदलिंगे, वडील सत्यवान तुकाराम अदलिंगे आणि भाऊ लक्ष्मण सत्यवान अदलिंगे या तिघांना अटक केली आहे.