राजेंद्र जंजाळ धमकी प्रकरणाने वातावरण तापले; पुंडलिकनगर पोलीस ठाण्याबाहेर शिवसैनिकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगर - शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना शुक्रवारी संध्याकाळी फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 'मी तुमची पाच लाख रुपयांत सुपारी घेतली आहे. मला दहा लाख रुपये द्या, अन्यथा मला माझे काम करावे लागेल,' अशा शब्दांत धमकी दिल्याचा दावा जंजाळ यांनी केला आहे.या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी राजेंद्र जंजाळ पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पोहोचले.