शिराळा : शिराळा शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहनचालकांना रस्त्यावर ताटक. वाहतूक पोलिसांची कमतरता, ‘नो पार्किंग’ नियमांची प्रभावी अंमलबजावणी नसणे आणि रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी करण्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न जटिल बनला आहे..शिराळा बसस्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. अनेक वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने एसटी आगारातून बस बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागते.